चेन्नई। दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिगदर्शक प्रताप पोथेन(Pratap Pothen) यांचं राहत्या घरी निधन झालं. त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीला धक्का बसला. प्रताप पोथेन यांनी 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
माध्यमांच्या माहितीनुसार पोथेन यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी (चेन्नई) आढळून आला. त्यांच्या मृत्युचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही. मात्र गेल्या काही काळापासून ते आजारी असल्याचं कळतंय.
प्रताप पोथेन यांनी मल्याळम, तामिळ आणि तेलगू तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. जवळपास 100 चित्रपटांमध्ये पोथेन यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. 1985 मध्ये त्यांनी अभिनेत्री राधिकाशी लग्न केलं. मात्र काही कारणामुळे त्यांचा संसार तुटला आणि 1986 मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला. 1990 मध्ये पोथेन पुन्हा एकदा लग्नाच्या बोहोल्यावर चढले. आमला सत्यनाथ या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहे. त्यांना एक मुलगी आहे. मात्र, यांचा संसार देखील फार काळ टिकला नाही. 22 वर्षांनंतर 2012 मध्ये पोथेन आणि आमला वेगळे झाले.
1987 मध्ये “आरावम” या सिनेमातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. तर 1985 मध्ये प्रदर्शित झालेला मीदुम ओरु कथल कथाई या चित्रपटातून दिगदर्शन करत पदार्पण केले. पोथेन यांच्या चामाराम, ठकार, पप्पू, इडवेला, कैकेयी, अक्षरंगल, ओण्णू मुठल पूज्यम वारे, आणि थनमाथरा या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं.
थोडक्यात बातम्या-
अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; नवं गाणं लवकरच येणार
“…तर मी शरद पवारांच्या घरी जाऊन माफी मागून दिलगीरी व्यक्त करेन, ते माझ्या गुरुसमान”
10 वी उत्तीर्ण आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच; पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी
“महाविकास आघाडीतून आम्ही बाहेर पडलो म्हणून जर आम्हाला गद्दार ठरवत असतील तर…”
“आज माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील आणि तुम्हाला नागडं करतील”
Comments are closed.