Top News मनोरंजन

ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अभिनेता अर्जुन रामपालची 7 तास चौकशी!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आलं. यामध्ये अभिनेत्री सारा अली खान, दीपिका पदुकोण यांसारख्या मोठ्या कलाकारांनंतर अभिनेता अर्जुन रामपाल याचंही नाव पुढे आलं.

एनसीबीने सोमवारी अर्जुनच्या घराची तसंच ऑफीसची झडती घेतली. याशिवाय एनसीबीने अर्जुनला समन्स पाठवलं होतं. त्याप्रमाणे शुक्रवारी तब्बल 7 तास अर्जुनची चौकशी करण्यात आली.

यापूर्वी एनसीबीकडून अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिएला डेमिट्रिएड्सचा भाऊ एगीसलोस डेमिट्रिएड्सला ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर एनसीबीने शुक्रवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत अर्जुनची देखील कसून चौकशी केलीये.

अर्जुनच्या आधी अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंगचं नावही ड्रग्स प्रकरणात उघडकीस आलं होतं. यांना देखील एनसीबीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

भाषा सांभाळून वापरा नाहीतर उलटे फटके पडतील; अनिल परब यांना भाजपचं प्रत्युत्तर

“नितीश कुमार दगाफटका करतात, बिहारमध्ये राजकीय भूकंप केव्हाही होऊ शकतो”

पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राचा वीरपुत्र शहीद, कोल्हापूरचे ऋषीकेश जोंधळे यांना 20व्या वर्षी वीरमरण

…तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट मातोश्रीसमोर आंदोलन करणार- नवनीत राणा

“नितीशकुमार हे शरद पवारांसारखे, सहजासहजी कुणाच्या हाती लागणार नाहीत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या