Top News क्राईम मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

विजय मल्ल्याचा बंगला खरेदी करणाऱ्या ‘या’ बड्या अभिनेत्याला ईडीनं केली अटक

Photo Credit - Youtube/ ingoanews

मुंबई |  मागील वर्षभरापासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडीने) धाडीचे जोरदार सत्र चालू केले आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालय नजर ठेवून असते. राजकारणी असो वा कलाकार, सर्वानाच व्यवहार स्पष्ट ठेवावे लागतात. सक्तवसुली संचालनालयाच्या रडारवर बाॅलिवुडचे कलाकार येत आहेत. आता पुन्हा आणखी एक बाॅलिवुड अभिनेता सक्तवसुली संचालनालयाच्या जाळ्यात अडकला आहे.

बाॅलिवुड अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीला ईडीने अटक केली. ओमकार रिअँल्टर्स प्रकरणी सचिनवर ही कारवाई झाली आहे. ओमकार गृप प्रमोटर्स आणि सचिन जोशी यांच्यात 100 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे ईडीला आढळून आले आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.  सुमारे 18 तासाच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली.

सचिनने कन्नड, तेलगु तसेच काही बाॅलिवुड चित्रपटात काम केले आहे. फरार आरोपी विजय माल्ल्या याचा गोव्यातील आलिशान बंगला ‘किंगफिशर व्हिला’ सचिन जोशीने 73 कोटींना खरेदी केला होता. याशिवाय भारतात त्याचे विविध ठिकाणी रेस्टाॅरंट आणि क्लब आहेत. सचिन जे.एम.जोशी गृपचा मालक आहे तर ओमकार गृप झोपडपट्टी विकास प्रकल्पात सहभागी आहे. यात 100 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

या आधी ईडीकडून त्याला समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर देखील सचिन चौकशीसाठी हजर झाला नव्हता. त्यानंतर त्याला अटक करून चौकशी करण्यात आली. या आधी मागच्या आठवड्यात ईडीने त्याच्या घरी आणि कार्यालयावर छापा टाकला होता. ईडीने या आधी ओमकार ग्रुपचे चेअरमन कमाल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना मनी लॉण्डरिंग प्रकरणी अटक केलेली आहे.

थोडक्यात बातम्या –

न्यायव्यवस्था खरंच जीर्ण झालीय का?; शरद पवार म्हणतात…

शेतकरी आंदोलन: देशात असंतोष पसरवण्याचा आरोप, 21 वर्षीय दिशा रवीला अटक

नाद करा पण आमचा कुठं?; दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यानं हेलिकॉप्टर घेतलं

महाराष्ट्रातील ‘या’ शहरानं रचला इतिहास, पेट्रोलनं शतक ठोकलं!

प्रवासात आजपासून ‘ही’ गोष्ट अनिवार्य, अन्यथा भरावी लागेल दुप्पट रक्कम!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या