बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी रुग्णालयात दाखल

 मुंबई | वेगवेगळ्या भूमिका साकारात अभिनय क्षेत्रात आपलं वेगळं असं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे आयुषमान खुराना. तो नेहमीच चर्चेत असलेला पहायला मिळतो. अशातच आता त्याची पत्नी ताहिरा कश्यपला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे.

ताहिराला तिच्या एका सवयीमुळे रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे. ताहिराला रोज दुधीचा ज्यूस घ्यायची सवय आहे. ज्यामध्ये दूधी आणि हळदीचं मिश्रण होतं. मात्र काल हे मिश्रण पिल्यावर तिला 20 वेळा उलट्या झाल्या. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं आणि आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तीची प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती आहे.

ताहिरानं याविषयी लोकांमध्येही जागरुकता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. तिनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. माझ्या सेटवरून बनवलेल्या या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रकारे शांत दिसत होते. पण डॉक्टरांनी मला जागरूकता पसरवायला सांगितलं, असल्याचं तिनं म्हटलं आहे.

दरम्यान, पुढे ताहिरानं म्हटलं की मला माहित आहे की, #greenjuice दूधी विषबाधाचे गंभीर परिणाम होतात. हे खूप घातक ठरु शकतात. फक्त आरोग्याच्या नावावर रस पिऊ नका. मी ICU मध्ये का होते याचं हे एक कारण आहे.

थोडक्यात बातम्या – 

पुराव्याशिवाय कोणालाही अटक केली जाणार नाही- योगी आदित्यनाथ

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मराठवाड्यात तब्बल 4 हजार कोटींचं नुकसान तर 38 लाख हेक्टरवरील पीक पाण्यात

‘नवाब मलिकांचं दुखणं वेगळं आहे, त्याबद्दल मी…’; मलिकांच्या आरोपावर फडणवीसांचा टोला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More