बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेते दलिप ताहील यांचा मुलगा ड्रग्ज प्रकरणी अटकेत; अशी करत होता अंमली पदार्थांची मागणी

मुंबई | प्रख्यात अभिनेते दलिप ताहील यांचा मुलगा ध्रुव ताहील याला ड्रग्ज प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून ध्रुव ताहील याला अटक करण्यात आली. ध्रुव ड्रग पेडलरकडे व्हॉट्सअॅपवरुन वारंवार अंमली पदार्थांची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे.

ध्रुव ताहील एका ड्रग पेडलरच्या संपर्कात होता. तो पेडलरकडून वारंवार ड्रग्जची मागणी करत होता. ड्रग्जसाठी ध्रुवने त्याला पैसे दिल्याचंही उघड झालं आहे. दोघांच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकानं कारवाई करत ध्रुव ताहील याला अटक केली आहे. एनडीपीएस कायद्याअंतर्गत ध्रुवला अटक झाली असून त्याला वांद्रे क्राईम ब्रांचमध्ये ठेवण्यात आलं होतं. आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

35 ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणात अँटी नार्कोटिक्स सेलकडून 20 एप्रिलला मुजमिल अब्दुल रहमान शेख याला अटक करण्यात आली होती. त्याचा मोबाईल अंमली पदार्थ विरोधी विभागानं ताब्यात घेतला होता. तेव्हा त्याच्या व्हॉट्सअॅपवर ध्रुव ताहील याच्यासोबतचे संभाषण समोर आले. ध्रुव मुजमिलकडे वारंवार ड्रग्जची मागणी करत होता. ध्रुवने ड्रग्जसाठी आरोपी मुजमिलच्या बँक खात्यात सहा वेळा ऑनलाईन पैसेही ट्रान्सफर केले होते, असं तपासात स्पष्ट झालं. मार्च 2019 पासून दोघं संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ध्रुव ताहील याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान, 68 वर्षीय दलिप ताहिल जवळपास पाच दशकांपासून चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. ताहिल यांच्या खलनायकी भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. अंकुर चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांचे एकापेक्षा एक सिनेमे गाजले आहेत.

थोडक्यात बातम्या

“कोरोना परिस्थिती हाताळण्यात भारतातील राजकीय नेतृत्व अपयशी ठरलं”

…अन् 25 वर्षीय महिलेनं एकाच वेळी दिला चक्क नऊ बाळांना जन्म

डाॅक्टरांना राक्षस संबोधन आलं अंगलट; कॉमेडियन सुनिल पालविरोधात गुन्हा दाखल

लाॅकडाऊनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पुणे शहर रक्ताच्या थारोळ्यात

…म्हणून अशोक चव्हाणांनी मानले खासदार संभाजीराजेंचे आभार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More