महाराष्ट्र मुंबई

“ज्यांचं नाव वापरून सत्तेत आलात त्यांचा हाच पुतळा तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही”

मुंबई | बेळगाव जिल्ह्यातील एका गावातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे. मनगुत्ती गावातील शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री हा पुतळा काढण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने शिवभक्तांमध्ये एकच संताप पाहायला मिळत आहे. अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे यानेही झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे.

ज्यांचं नाव वापरून सत्तेत आलात त्यांचा हाच पुतळा आता तुम्हाला गाडल्या शिवाय राहणार नाही, अशा शब्दात हेमंतने आफला संताप व्यक्त केला आहे. झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी हेमंतने ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्याने आपल्या भावना व्यक्त करत इथल्या मातीच्या कणाकणातुन शिवाजी महाराजांना हटवणारा अजुन पैदा व्हायचाय, असं ठणाकावून सांगितलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचं धाडस केलत खरं पण इथल्या मातीच्या कणाकणातुन त्यांना हटवणारा अजुन पैदा व्हायचाय… आणि तो कधीच होऊ शकत नाही, ज्यांचं नाव वापरून सत्तेत आलात त्यांचा हाच पुतळा आता तुम्हाला गाडल्या शिवाय राहणार नाही, असं हेमंत ढोमे म्हणाला आहे.

 

 

ळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाव कमी झाला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे.

सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बारामतीत ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी…., अजितदादांच्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना

प्रवीण दरेकर यांचा मुंबई महानगरपालिकेवर गंभीर आरोप, म्हणाले…

अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या