बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मिल्खा सिंग यांची भूमिका साकारणारा अभिनेता फरहान अख्तर म्हणाला….

मुंबई | भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सर्व नेते, अभिनेते, क्रीडापटूंनी शोक व्यक्त केला आहे. अशात प्रकारे मिल्खा सिंग यांच्यावरील चित्रपटात मिल्खा सिंग यांची भूमिका साकारणारा बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरनेही शोक व्यक्त केला आहे.

प्रिय मिल्खाजी, तुम्ही या जगात नाहीत हे स्वीकारण्यासाठी माझं मन तयार नाही. कदाचित तुमच्याकडून मला मिळालेली ही ती एक जिद्द न सोडण्याची बाजू म्हणता येईल. कधीही हार न मानण्याची बाजू आणि सत्य हे आहे की तुम्ही आमच्यात कायम जिवंत रहाल, असं फरहान अख्तरने म्हटलं आहे. यासंदर्भात त्याने पोस्ट केली आहे.

तुम्ही खूप प्रेमळ, मोठ्या मनाचे आणि दयाळू व्यक्ती होता. तुम्ही तुमच्या कल्पना, तुमचं स्वप्न साकारलं. मेहनत, प्रामिणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर आकाशाला स्पर्श करणंही शक्य असल्याचं तुम्ही दाखवून दिलं असल्याचं फरहान म्हणाला.

दरम्यान, तुमचा आमच्या सर्वांच्या आयुष्यावर प्रभाव आहे. जे तुम्हाला एक पिता आणि मित्र म्हणून ओळखतात त्या सर्वांसाठी तुमचा सहवास म्हणजे खरं तर आशिर्वाद आहे आणि ज्यांना तुमचा सहवास लाभला नाही त्यांना तुमची कहाणी कायम प्रेरणा देईल, असंही फरहानने म्हटलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

थोडक्यात बातम्या- 

सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; वाचा आजचे दर

मोफत ‘शिवभोजन’ थाळीच्या मुदतीत केली वाढ; मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला दिलासा

सावधान! फिरायला जाणाऱ्यांना आता 15 दिवस होम क्वारंटाईन करणार; अजित पवारांचा दणका

5 मिनिटांत टोचवली दोन वेगळ्या कंपनीची लस; हलगर्जीपणामुळे अशी झाली महिलेची अवस्था

2024 मध्ये मुख्यमंत्री कुणाचा होणार?, प्रफुल्ल पटेल म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More