बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला शेवटच्या श्वासापर्यंत…’; अखेरपर्यंत नटू काकांची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण!

मुंबई | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील नटू काकांची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचं रविवारी निधन झालं. त्यांनी 78 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अभिनेते घनश्याम नायक यांनी अलिकडेच एका मुलाखतीत आपली शेवटची इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ती इच्छा अपुरीच राहिली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते आसित कुमार मोदी यांनी घनश्याम नायक यांच्या निधनाची माहिती दिली आहे. घनश्याम नायक गेल्या काही दिवसापासून कर्करोगाशी झुंज देत होते. कर्करोगाशी त्यांची ही झुंज रविवारी अखेरची ठरली.

गेल्या वर्षापासून कोरोनामुळे परिस्थिती बदलली आहे आणि कोरोना इथेच राहणार आहे. याचा अर्थ असा नाही की मी कोरोनाला घाबरेन, आणि घरात बसेन. मी सकारात्मक विचार करणारा माणूस आहे आणि मी निराश होऊ शकत नाही किंवा नकारात्मक विचार करत नाही. मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे आणि चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा आहे. माझी ही इच्छा देवाने पुर्ण केली पाहिजे, असं घनश्याम नायक अर्थात नट्टू काकांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, घनश्याम नायक यांनी 350 पेक्षा हिंदी मालिकेमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर बेटा, लाडला, क्रांतिवीर, बरसात, घातक, चाइना गेट, हम दिल दे चुके सनम, लज्जा, खाकी, तेरे नाम यासारख्या बॉलिवुड चित्रपटात देखील काम केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्य लोकसेवा आयोगाकडून 2021 च्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध, ‘या’ तारखेला होणार परीक्षा!

‘शिवसैनिक रडणारा नाही तर…’; सेनेला रामराम करत भाजपवासी झालेल्या साबणेंवर राऊतांचं टीकास्त्र!

ब्रेकिंग | पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची हजेरी

आर्यनला ज्या पार्टीतून उचललं ‘त्या’ पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ!

मुलगा ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे किंग खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More