बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महासत्ता नाही, ‘महाथट्टा’ नक्कीच झालीय”; अभिनेता हेमंत ढोमेने व्यक्त केला संताप

मुंबई | देशभर कोरोना लसीकरण चालू आहे. सध्या 45 वर्षावरील लोकांना कोरोना लस देत आहेत. लोकही वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लस घ्यायला जाताना दिसत आहेत. मात्र तिथे त्यांना लाईनमध्ये उभं रहाव लागत आहे. रणरणत्या उन्हात नागरिक लस घेण्यासाठी थांबाव लागत असल्यामुळे मराठी अभिनेता हेमंत ढोमेने संताप व्यक्त केला आहे.

सर्व नियम पाळणारा, सरकारला प्रामाणिकपणे टॅक्स भरणारा,  या देशावर प्रचंड प्रेम असणारा माझा सामान्य माणुस आत्ता आरोग्य सुविधांसाठी जगण्यआसाठी रांगेत उभा आहे. उन्हा-तान्हाचा कुठल्याही सावलीशिवाय खूप वय असलेला, थकलेला, असं हेमंत ढोमेनं म्हटलं आहे. याबाबत त्याने ट्विट करत काही फोटो पोस्ट केले आहेत. आत्ता नेस्को (गोरेगाव, मुंबई) बाहेर लांब रांग!  लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावून उभ्या असलेल्या लोकांचे फोटो त्याने ट्विट केले आहेत.

कमीत कमी 1 किलोमीटर तरी हजारो लोक आहेत गेटवर. चेंगराचेंगरी. सोशल डिस्टन्सिंगचा पत्ता नाही. एवढं करुन लस मिळेल की नाही हेसुद्धा माहित नाही. सारी व्यवस्था कोलमडलीये. माणसाला माणसासारखं तरी वागवा महासत्ता होणार म्हणे, महाथट्टा नक्कीच झाली आहे, असंही हेमंत ढोमेनं म्हटलं आहे.

दरम्यान,  1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यानंतर अनेक राज्यांनी 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात देखील 18 ते 45 वयोगटातील प्रत्येकाचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचं मंत्री नबाव मलिक यांनी सांगितलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

जोतिबा यात्रेवर कोरोनाचं सावट; यात्रेतील मानकरीच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने यात्रा रद्द

दिलासादायक! मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आजची आकडेवारी

सचिन वाझेचा धनी अनिल देशमुख मग देशमुखांचा धनी कोण?- गोपीचंद पडळकर

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

प्रसिद्ध राजन-साजन जोडीतील पद्मभूषण राजन मिश्रा यांचं कोरोनानं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More