बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लवकरच पेट्रोल-डिझेल तारण कर्ज सुरू होणार”, मराठी अभिनेत्याचा खोचक टोला

मुंबई | मागील काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे सातत्याने वाढणारे दर हा कळीचा मुद्दा बनला आहे. त्यातच आता याच विषयावरून मराठी अभिनेता हेमंत ढोमे याने ट्विट करत पेट्रोल कर्ज सुरू होणार असं म्हटलंय. हेमंतने एकप्रकारे पेट्रोल-डिझेलच्या दरावरून टोला लगावला आहे. त्याने केलेलं ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

हेमंतने ट्विटमधून सध्याच्या पेट्रोल डिझेलचे सातत्याने वाढत असलेल्या दराला लक्ष्य करत टोला लगावला आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे. “लवकरच पेट्रोल- डिझेल तारण कर्ज सुरू होणार, लोकांनी पेट्रोल बँकेत गहाण ठेवायला सुरूवात केलीये. तुम्ही पण या स्किमचा लाभ घ्या”, असं ट्विट करत हेमंतने या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

हेमंत सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. विशेषत: ट्विटरवर तो नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत मांडताना दिसतो. हेमंत ढोमे हा मराठी चित्रपटसृष्टीतील उत्तम अभिनेता आहे. मराठी अभिनेत्री क्षिती जोग ही हेमंतची पत्नी आहे. क्षिती नुकतीच झिम्मा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. क्षिती देखील सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते.

देशातील सध्याचे पेट्रोल- डिझेलचे दर हे आतापर्यंत सर्वाधिक आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. देशात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केलेली होतीच. मात्र आता डिझेलनेही शंभरी पार केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

…अन् वकिलांच्या ‘या’ जबरदस्त युक्तिवादामुळे आर्यनचा जामीन झाला मंजूर

“मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केलं”

सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडली, कावेरी रुग्णालयात दाखल

फोन टॅपिंग प्रकरणातील ‘तो’ गोपनीय अहवाल फडणवीसांनी नाही तर या नेत्यांनी उघड केला

ख्रिस्तियानो रोनाल्डो आता होणार 6 मुलांचा बाबा, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली बातमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More