बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील अभिनेते हेमंत जोशी यांचं कोरोनाने निधन!

मुंबई  | ‘जीव झाला येडापिसा’ या लोकप्रिय मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांनी ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत ‘भावे’ ही भूमिका साकारली होती.

हेमंत जोशी यांनी मालिका, चित्रपटांसह अनेक नाटकांमध्ये काम केले होतं. ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘टेंडल्या’, ‘बालगंधर्व’ अशा अनेक सिनेमांत ते दिसले. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतही त्यांनी काम केलं होतं.

अभिनेते हेमंत जोशी यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या सहकलाकारांना मोठा धक्का बसला आहे. हेमंत जोशींच्या निधनावर अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ‘जीव झाला येडा पिसा’मध्ये विजया काकी ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमेधा दातारने आपल्या इन्स्टाग्रामवर हेमंत यांचा फोटो शेयर करत अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता सुप्रीत निकम यानेही त्यांच्या निधनावर भावुक पोस्ट लिहिली आहे. आज तुमच्या रूपाने मी माझा एक मित्र गमावला आहे. कारण वडीलधारी असूनही तुम्ही जवळच्या मित्रानपेक्षा कमी नव्हता. काका, तुम्ही नेहमी तक्रार करायचात की मी फोन करत नाही, आता कुणाला फोन करू, असं त्याने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

पोटात चाकू खूपसून 13 वर्षाच्या मुलाने वडिलांची केली हत्या; कारण ऐकून सगळेच हादरले

दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होताच मदतीची घोषणा करणार- उद्धव ठाकरे

‘हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय’; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

पंजाबमध्ये भारतीय वायुसेनेचं फायटर जेट कोसळलं; एका पायलटचा मृत्यु, पाहा व्हिडीओ

राज्यातील 26 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, पाहा कुणाची बदली कुठे?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More