बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक

मुंबई | पत्नीला मारहाण केल्या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहराला अटक केली आहे. या घटनेमुळे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे.

निशा रावलने करणच्या विरोधात गोरेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर करणला सोमवारी रात्रीच अटक करण्यात आली, असं वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिलं.

मेहरा आणि निशा रावल यांच्या नात्यात वाद निर्माण झाला होता. पण सोमवारी दोघांमध्ये वाद पुन्हा एकदा विकोपाला गेला. त्यामुळे करण आणि निशामध्ये कडाक्याचं भांडण झालं. यादरम्यान करणने निशाला मारहाण केल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, करण मेहरा हा हिंदी टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे तो विशेष गाजला. या मालिकेत तो मध्यवर्ती भूमिकेत होता. याशिवाय त्यानं हिंदी बिग बॉस स्पर्धेतही सहभाग घेतला होता. तसेच काही दिवसांपूर्वी माझ्या ओळखीतील अनेक व्यक्तींचा मागील काळात मृत्यू झाला आहे, ज्यामुळं मी तणावात आहे, असं करण म्हणाला होता.

थोडक्यात बातम्या- 

सकारात्मक बातमी: वय 92, HRCT स्कोअर 12, त्यात मूत्रपिंडाला सूज; तरीही कोरोनावर मात!

“…तर आज देशात एवढ्या जणांचा मृत्यू झाला नसता”

‘पक्षीय अजेंडा आवरून ही देशाला सावरण्याची वेळ’; रोहित पवारांचा मोदी सरकारला सल्ला

‘मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कुच करा’; खासदार संभाजीराजेंचा कार्यकर्त्यांना आदेश

“मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचे उद्धव ठाकरे कधीच नव्हते”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More