Kiran Gaikwad | प्रसिद्ध अभिनेता किरण गायकवाडला झी मराठीच्या ‘लागिर झालं जी’ या मालिकेतील ‘भैय्यासाहेब’ या भूमिकेमुळे लोकप्रियता मिळाली. यानंतर “देवमाणूस’ या मालिकेतील डॉक्टरची भूमिका देखील चांगलीच गाजली. या मालिकेनंतर अभिनेता ‘चौक’ या सिनेमात झळकला होता. या सिनेमातील त्याची (Kiran Gaikwad) भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली.
अशात अभिनेत्याने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. या सिनेमा दरम्यानच किरण गायकवाड याने अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असल्याचं सांगितलं आहे. इतकंच नाही तर, या काळात डिप्रेशनच्या गोळ्या देखील खाव्या लागल्याचं अभिनेत्याने सांगितलं.
अभिनेत्यासोबत घडला डबल डेटिंगचा प्रकार
अभिनेता किरण गायकवाडचे सहा महीने ठरलेलं लग्न मोडल्याने तो डिप्रेशनमध्ये गेला होता. या सहा महिन्याच्या कालावधीत 3 ते 4 वेळा त्याची होणाऱ्या पत्नीसोबत भेट झाली होती. त्याने भावी पत्नीसोबत भविष्याची काही स्वप्न रंगवली होती.
मात्र, सगळं काही आनंदी आणि सुरळीत सुरू असताना अभिनेत्यासोबत मोठा धोका झाला. त्याला फसवण्यात आलं.यामुळे ठरलेलं लग्न मोडलं. हा काळ अतिशय कठिण होता. या काळात मला डिप्रेशनच्या गोळ्या घ्याव्या लागल्या, असा खुलासा अभिनेता किरण गायकवाडने (Kiran Gaikwad) केला.
किरण गायकवाडने डिप्रेशनचा सामना केला
ज्या मुलीसोबत किरण (Kiran Gaikwad) लग्न करणार होता, तिने त्याला फसवलं.ती व्यक्ती डबल डेटिंग करत असल्याचा प्रकार त्याला नंतर समजला.एका बाजूला सिनेमाचं शुटिंग सुरु होतं तर दुसरीकडे अशा कठिण प्रसंगातून किरण जात होता. यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्यामुळे त्याला डॉक्टरने गोळ्या देखील सुरु केल्या होत्या.
या कठीण प्रसंगाबद्दल बोलताना किरण म्हणाला की, “या सर्व घटनेचा माझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम झाला. कळत होतं की, आपण चुकीचा विचार करतोय. पण तरी देखील ती परिस्थिती अशी असते की, या काळात आपल्याला तिसऱ्या व्यक्तीची गरज लागते. जे झालं ते चुकीचं झालं, हे सांगायला एक हात पाठीवर लागत असतो.”
News Title – Actor Kiran Gaikwad battled depression
महत्त्वाच्या बातम्या-
रेल्वेमध्ये मेगा भरती! 7 हजारांपेक्षाही अधिक पदे भरली जाणार, ‘असा’ करा अर्ज
बालभारती पुस्तकातील ‘वन्समोअर’ शब्दावरून वाद; शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिलं स्पष्टीकरण
“सत्ता आणायला छत्रपती लागतात, पण..”; जरांगे पाटलांचा आता थेट PM मोदींवरच हल्लाबोल
“मला जेलमध्ये टाकून जीवे मारले जाऊ शकते”; फडणवीसांचं नाव घेत जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप
मनोज जरांगेंच्या आरक्षणाला स्थगिती, सरकारला ‘या’ तारखेपर्यंत दिला वेळ