बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सॉरी उद्धवजी… मला तुमची माफी मागायचीय; मुख्यमंत्र्यांकडे अभिनेत्याचा माफीनामा

मुंबई | सध्या देशभरात कोरोना व्हायरस हाहाकार माजवला आहे. त्यातही महाराष्ट्रात या व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण सापडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सर्व परिस्थिती हाताळत आहेत, ते पाहिल्यावर आता त्यांच्या टीकाकारांनीही त्यांची प्रशंसा करायला सुरुवात केली आहे. एका अभिनेत्याने फेसबुकवर पोस्ट लिहून उद्धव ठाकरेंची माफी मागितली आहे.

सॉरी उद्धवजी.. मी किरण माने. मला तुमची माफी मागायचीय. तुम्ही पूर्वीच्या सरकारमध्ये असताना तुमची हतबलता पाहुन खूप टीका केली होती तुमच्यावर ! कणा नसलेला नेता.. ताटाखालचं मांजर म्हणायचो… भाजपासोबत झालेली तुमची फरपट पाहून ‘शिवसेनेचा कणखरपणा बाळासाहेबांबरोबर गेला’ असं मला वाटायचं. आज तुम्ही मला खोटं ठरवलंत. अशा आशयाची मराठी अभिनेते किरण माने यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माझं घर सातार्‍यात अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. शांत एरीया. तिथपर्यन्तसुद्धा रोज रात्रंदिवस पोलीसांनी गस्त घालणं.. इतकी ‘एफिशियन्सी’ आम्ही आयुष्यात पहिल्यांदा अनुभवतोय. संपूर्ण प्रशासन हललंय. खूप आधार वाटतोय, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, किरण मानेंच्या पोस्टवर सध्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. ज्यात सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक करताना दिसत आहेत.

 

ट्रेंडिंग बातम्या-

गरिबांना तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप होणार- निर्मला सीतारामन

कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, खपवून घेतलं जाणार नाही- धनंजय मुंडे

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More