Top News

‘म्हातारपणी असा अपमान का करुन घेतोस?’; ‘या’ अभिनेत्याचा धोनीला सवाल

दुबई | चेन्नईच्या सलग तीन परावभवांनंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीका होतायत. शिवाय यामध्येच त्याचा खेळ आणि वाढतं वय हे देखील चर्चेचा विषय बनला आहे.

यावर अभिनेता कमाल आर खान याने प्रतिक्रिया देत ट्विट केलंय. तो म्हणाला, ‘केस काळे करुन कोणी तरुण होत नाही. दोन धावा घेताना तुला धाप लागतेय. वय वाढल्यानंतर असा त्रास होतोच. पण म्हातारपणी असा अपमान का करुन घेतोस?’

‘आम्ही तुझे फॅन आहोत, तुझी अशी अवस्था पाहून खुप दु:ख होतंय. त्यामुळे कृपया तू निवृत्ती स्वीकार,’ असंही तो म्हणाला. यावर धोनीच्या चाहत्यांनी मात्र केआरकेला चांगलंच सुनावलंय.

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या