बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! कर्ज काढून ‘या’ अभिनेत्याने कर्मचाऱ्यांना दिला पुढील सहा महिन्यांचा पगार

लंडन | लॉकडाउनमुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही अभिनेता मार्क वॉलबर्गनं आपल्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. त्याने पुढील सहा महिन्यांचा पगार देऊन त्यांना सुट्टीवर पाठवलं आहे.

मार्क वॉलबर्ग हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयासोबतच तो हॉटेल व्यवसायातही कार्यरत आहे. इंग्लंडमध्ये त्याच्या मालकीची पाच हॉटेल्स आहेत. पण कोरोनामुळे गेले दोन महिने हॉटेल बंद आहेत.

मार्कला दररोज लाखो रुपयांचं नुकसात होत आहे. पण या आर्थिक संकटातही त्याने आपल्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. मार्कने पुढील सहा महिन्यांचा पगार देउन कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवलं आहे.

दरम्यान, मार्कने काही कर्ज देखील घेतलं आहे. त्याने केलेल्या मदतीमुळे कर्मचारी खुश आहेत. लॉकडाउन संपताच आणखी जोमाने काम करण्याचा निश्चय कर्मचाऱ्यांनी केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

परिवहन मंत्री अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; पाहा कुणी केली ही मागणी?

“चुकीची माहिती दिली म्हणून पत्रकाराला अटक केली, आता मंत्र्यांना अटक होणार का?”

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव; जेलमधील 50 टक्के कैद्यांना सोडणार

कर्ज फेडण्यासाठी अनिल अंबानी यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई-पुण्यातून रेल्वे कुठे आणि कधी सुटणार?; वाचा संपूर्ण माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More