बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘थोडी तरी लाज बाळगा’; परदेशी गेलेल्या सेलिब्रिटींना नवाजुद्दीनने झापलं

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यादरम्यान अनेक सेलिब्रिटी परदेशी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत. या सेलिब्रिटींना बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने झापलं आहे.

लोकांना अन्न नाही आणि तुम्ही पैसे फेकून एन्जॉय करत आहात. थोडी तरी लाज राखा, अशा शब्दांत नवाजुद्दीन सिद्दीकीने परदेशी गेलेल्या सेलिब्रिटींना सुनावलं आहे. ते लोक काय बोलतील? या लोकांनी मालदीवला एक तमाशा बनवला आहे. मला नाही माहिती त्यांचे टूरिजम इंडस्ट्रीशी काय लागेबंध आहेत. पण माणुसकीच्या नात्याने तर कृपया आपल्या व्हॅकेशनचे फोटो आपल्याकडे ठेवा, असं नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला.

इथं प्रत्येकजण कठीण काळाला सामोऱ्य जातो आहे. कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, ज्या लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे, त्यांना हे फोटो दाखवून आणि दु:खी करु नका, असंही नवाजुद्दीन सिद्दीकीने म्हटलंय. मालदीवला जाणार आहेस का? असा प्रश्न वाजुद्दीन सिद्दीकीला विचारण्यात आला. यावर  बिलकुल नाही, मी माझ्या घरी बुधानामध्ये कुटुंबासमवेत आहे. हे माझे मालदीव आहे, असं त्याने म्हटलंय.

दरम्यान, याआधी बाॅलिवूड अभिनेत्री श्रूती हसनने देखील मालदीवमध्ये एन्जॉय करणाऱ्या सेलिब्रिटींवर निशाणा साधला होता. सुट्टी एन्जॉय करणं हा त्यांचा हक्क आहे. पण व्यक्तिश: माझं मत विचाराल तर मास्क काढून पूलमध्ये उतरण्याची ही वेळ नाही. हा कठीण काळ आहे, असं श्रूती हासनने म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत, आता ‘जन की बात’ करा- राहुल गांधी

प्रसिद्ध गीतकार हरेंद्र जाधव यांचं निधन; वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे, घाबरून जाऊ नका- नरेंद्र मोदी

‘वाॅर्डात फिरतो तेव्हा गोरगरिबांचे हाल बघवत नाहीत’; ‘या’ आमदाराने रेमडेसिविरसाठी 90 लाखांची FD मोडली

‘मासिक पाळीदरम्यान लस घेऊ नये’; त्या व्हायरल मेसेजवर सरकारने दिलं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More