बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘या’ कारणामुळे सोडला ओटीटी प्लॅटफॉर्म; चाहत्यांना बसला मोठा धक्का

मुंबई | चित्रपटसृष्टीत अगदी कमी काळात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने अलिकडेच मोठा निर्णय घेतला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मचा धंदा झाल्याचं मत व्यक्त करत यापूढे आता नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईमसारख्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे.

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्वत:ला स्टार समजणाऱ्या अभिनेत्यांसाठी आणि मोठमोठ्या निर्मात्या कंपन्यांसाठी धंदा झाला आहे. बॉलिवुडमधील प्रमुख चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्व मोठ्या लोकांशी फायद्याचे करार केले आहेत. निर्मात्यांना अमर्यादीत कंटेंट तयार करण्यासाठी प्रचंड मोठी रक्कम मिळते, मात्र, अमर्यादीत कंटेंटने गुणवत्तेला मारलं आहे, असं सिद्दीकी म्हणाला.

सध्या या ठिकाणी असे शो आहेत, जे एकतर पाहण्याच्या लायकीचे नाहीत किंवा कशाचे तरी सिक्वल आहेत. ज्यामध्ये नवं काहीच सांगण्यासारखं नाही. मी जेव्हा सेक्रेड गेमसाठी नेटफ्लिक्ससोबत काम करायला सुरूवात केली तेव्हा खूप डिजिटल मीडियाविषयी खूप उत्सूकता आणि आव्हानं होती. नव्या लोकांना संधी दिली जात होती, मात्र आता त्याचा ताजेपणा निघून गेला आहे, असंही सिद्दीकीने म्हटलं आहे.

दरम्यान, नवाजूद्दीन सिद्दीकीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर सेक्रेड गेम, सीरीयस मॅन सारख्या अनेक हिट वेबसीरीज दिल्या आहेत. त्यामुळे कमी कालावधीत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“त्यांनी लवंगी फटाके फोडले, मी 3 जावयांचे दिवाळीत एकदमच बॉम्ब फोडणार”

एमआयएममध्ये फूट?, ‘त्या’ व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ

“पुढचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या…”

तालिबान्यांचा क्रुरपणा! लग्नात संगीत लावल्यामुळे 13 अफगाण लोकांची हत्या

‘ते’ आंदोलन भोवलं; पडळकरांसह 70 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More