बाॅलिवूडमधील पुरुष नेहमीच जवान राहतात- पूजा भट्ट

मुंबई | बाॅलिवूडमध्ये काम करणाऱ्या महिलांना चाळीशीनंतर काम मिळणं बंद होऊन जातं. मात्र, पुरुषांसोबत असं होत नाही, असं वक्तव्य अभिनेत्री आणि दिग्दर्शक पूजा भट्ट यांनी केलं आहे.

भारतात पुरुष कधीच वृद्ध होत नाहीत. ते नेहमीच जवान राहतात. त्यामुळे त्यांना चाळीशीनंतरही काम मिळत राहतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

वयाने लहान असणाऱ्या महिलांना अभिनेत्याच्या आईची भूमिका पार पाडावी लागते. ‘जख्म’ चित्रपटामध्ये मी अजय देवदनच्या आईचा रोल केला होता,असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुजा भट्ट यांचा ‘सडक 2’ चित्रपट येणार आहे. 90 च्या दशकात सडक चित्रपट हीट ठरला होता.

महत्वाच्या बातम्या-

-राेहीत शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताचा एकदिवसीय सामन्यात पराभव

-चौकीदार आता एकालाही सोडणार नाही- नरेंद्र मोदी

-पंड्या- राहूलला ‘कॉफी’ महागात, आगामी विश्वचषक स्पर्धेला मुकणार?

-सरदार पटेल पहिले पंतप्रधान असते तर देशाचं चित्र वेगळं असतं- नरेंद्र मोदी

-साहित्यिकांनी झुंडशाहीसमोर झुकणं योग्य नाही- अरुणा ढेरे