नवी दिल्ली | अभिनेता प्रभास त्याच्या चित्रपटांमुळे खूपच प्रसिद्ध आहे. त्यातच बाहुबलीने चित्रपटाने रसिकांची मने जिंकली. नुकतेच दक्षिणात्य अभिनेता आणि अॅक्शनचे स्टार प्रभास यांनी पर्यायवरणाच्या संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.
हैदराबादजवळील १,६५० एकरमध्ये पसरलेले आरक्षित वन क्षेत्राला विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रभास यांनी २ कोटींचा धनादेश वन अधिकाऱ्यांकडे दिला. या कार्यक्रमाला तेलंगणाचे वनमंत्री आलोला करण रेड्डी आणि खासदार संतोष कुमार आणि आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभासने अधिकृत इन्स्टाग्रामवरून ही माहिती दिली आहे. कॅप्शनमध्ये लिहून त्याबरोबर एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्यात लिहिलंय, १६५० एकर विस्तृत वन क्षेत्र विकसित करणार आहे.
पुढे लिहिलंय, हे वन क्षेत्र संगारेड्डी जिल्ह्यातील खाजीपल्लीमध्ये आहे. प्रभासने स्वतः जाऊन या क्षेत्राची पाहणी केली. प्रभासने सांगितले, ग्रीन चॅलेंजला प्रभावित होऊन हे पाऊल उचलले आहे.
Hyderabad: Actor Prabhas adopts 1650 acres of Khazipally reserve forest, under Green Indian Challenge program by MP Joginapally Santosh Kumar. It’ll be developed as an urban eco-park, foundation of which was laid down by the actor, MP & forest minister A Indrakaran Reddy today. pic.twitter.com/JaFkrXAcoG
— ANI (@ANI) September 7, 2020
महत्वाच्या बातम्या-
गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा धमकीचा फोन!
‘दुजाभावाचा आणि दबावाखाली काम करण्याचा आपण कळस गाठला आहे’; पाटलांचं रामराजे निंबाळकरांना पत्र
तुकाराम मुंढेंचं अर्धवट राहिलेलं ‘ते’ काम नागपूरच्या नव्या पालिका आयुक्तांनी केलं पुर्ण!
चिंताजनक! राज्यात आज 20 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद
‘ते तुटतील पण वाकणार नाहीत’; आमदार रोहित पवारांनी विरोधकांना खडसावलं
Comments are closed.