मनोरंजन

अभिनेत्री प्राजक्ता माळी विरूद्ध अटक वॅारंट जारी

मुंबई | मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीविरूद्ध जामीनपात्र अटक वॅारंट जारी करण्यात आलं आहे. कोर्टात हजर न राहिल्याबद्धल एक हजार रूपयांचा दंड आकारत, ठाणे कोर्टानं जामीनपात्र अटक वॅारंट जारी केलं आहे.

सुनावणीसाठी प्राजक्तानं कोर्टात हजर रहावं यासाठी तिला वारंवार समन्स जारी करण्यात आला होतं. मात्र ती एकदाही कोर्टात हजर राहीली नाही. तिच्याविरोधात तिची ड्रेस डिझायनर जान्हवी मनचंदाने ठाणे कोर्टात याचिका दाखल केली आहे.

आपल्याच ड्रेस डिझायनरसोबत केलेली हाणामारी प्राजक्ताला चांगलीच भोवली आहे. 5 एप्रिल 2019 रोजी मिरारोड इथल्या मोनार्क स्टुडिओमध्ये एका मराठी हास्य रिअ‌ॅलिटी शो दरम्यान हा सारा प्रसंग घडला होता. पहिला ड्रेस दिग्दर्शकाने नापसंत केला. दुसरा ड्रेस घालण्यास तयार नसलेल्या प्राजक्ताने स्वत: कात्री घेऊन तो ड्रेस कापला त्यामुळं दोघीत वाद झाला.

या वादानंतर प्राजक्ताने मला व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावून मारहाण केली,  असा आरोप जान्हवीनं केला आहे. मात्र प्राजक्तानं या सर्व आरोपांचं खंडन करत, जान्हवीनं स्वत:च स्वत:ला इजा करून आपल्याविरोधात खोटा आरोप केला आहे, असा दावा प्राजक्तानं केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या