Top News मनोरंजन

‘कंगणा राणावत स्वतःला झाशीची राणी समजत असेल तर….’; प्रकाश राज यांचा टोला

मुंबई | कंगणा राणावत आणि शिवसेना यांच्यामध्ये सध्या वाकयुद्ध सुरु आहे. यामुळे शिवसेना तसंच अभिनेत्री  कंगणा राणावत अनेकांकडून यांच्यावर टीका केली जातेय. त्यातच आता अभिनेता प्रकाश राज यांनी कंगणावर निशाणा साधला आहे.

अभिनेते प्रकाश राज यांनी एक मीम शेअर केलं आहे. इंस्टाग्रावर शेअऱ केलेल्या या मीमच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे कंगणाला खोचक टोला लगावला आहे.

कंगणाने मणिकर्णिका चित्रपटात झाशीच्या राणीची भूमिका केली होती. या मीमनुसार, कंगणा एका चित्रपटानंतर जर स्वत:ला झाशीची राणी समजू लागली तर, दीपिका पदुकोण स्वत:ला राणी पद्मावती, हृतिक रोशन अकबर, शाहरुख खान राजा अशोक, अजय देवगण भगत सिंग, आमिर खान मंगल पांडे आणि विवेक ओबेरॉयला पंतप्रधान मोदी असंच समजायला हवं.

अभिनेता प्रकाश राज सोशल मिडीयावर खूप सक्रीय असतात. अनेक मुद्दयांवर ते भाष्यही करतात. कंगणासंबंधीच्या वादात त्यांनी शेअर केलेल्या मीमची फार चर्चा होतेय.

महत्वाच्या बातम्या-

“शिवसेना बदललेली नाही, आजही गुंडा पार्टीच आहे”

‘मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो….’; नाथाभाऊंनी केला मोठा गौप्यस्फोट

“…म्हणून कंगणा राणावतला Y+ सुरक्षा दिली

चिंताजनक! पिंपरी- चिंचवड शहरात पुन्हा वाढला कोरोनाचा आकडा

‘मुंबईच्या महापौरांनी SRA सोसायटीतील फ्लॅट बळकावला’; भाजपचा गंभीर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या