Chitra Wagh | ठाकरे गटाने राजकीय जाहिरात करताना ‘अॅडल्ट स्टार’चा वापर केला, असा आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय. इतकंच नाही तर, हा पॉर्न अभिनेता तुम्ही जाहिरातीत घेतलाच कसा?, असा सवालही वाघ यांनी ठाकरे गटाला केला आहे. यावरून आता प्रचंड वाद निर्माण झाला आहे.
चित्रा वाघ यांना हे आरोप चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. कारण संबंधित अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी चित्रा वाघ यांना इशारा दिला आहे. चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन, असा इशाराच या अभिनेत्याने दिला आहे.
“चित्रा वाघ यांनी शब्द मागे घ्यावेत, अन्यथा..”
“मी एक चरित्र अभिनेता आहे आणि एका कलावंताचा अपमान केला म्हणून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, माझी माफी मागावी अन्यथा, इच्छा नसतानाही मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन ”, असा इशारा प्याराली उर्फ राज नयानी यांनी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना दिला आहे.
कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमांत किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्याला त्या भूमिकेची जशी मागणी असते त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो हे त्यांना माहीत असावे. आज त्यांनी माझ्या एका वेबसिरीजच्या भूमेकेतील फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केलाय. त्यांचा हा दावा अत्यंत निंदनीय आहे. त्यांनी माझ्या अभिनयाला पॉर्न स्टारची उपमा देऊन माझी अब्रू नुकसानी केली आहे, असा संताप या अभिनेत्याने व्यक्त केला आहे.
आरोपांमुळे अभिनेत्याच्या कुटुंबाला नाहक त्रास
इतकंच नाही तर या आरोपांमुळे कुटुंबाला खूप त्रास झाल्याचं देखील या अभिनेत्याने म्हटलं आहे. “आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी माझी प्रतिमा मलीन केली.पण चित्राताई, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी कुटुंब व्यथित झालं आहे. गेल्या आठ वर्षात मी माझ्या तीन कुटुंबीयांना गमावलंय, त्यापैकी दोघांना तर करोना काळात गमावलं आहे. आता आम्ही तिघंच आहोत. मी एक पिता असून माझ्या दोन लेकरांचं पालनपोषण करतोय”, अशा भावना या अभिनेत्याने व्यक्त केल्या आहेत.
“चित्रा वाघ यांनी माझी दोन दिवसात जाहीर माफी मागावी, अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसान केल्याचा दावा कोर्टात दाखल करेन”, असं अभिनेता राज नयानी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना हे आरोप आता महागात पडणार असल्याचं चित्र आहे.
नेमकं प्रकरण काय?
ठाकरे गटाने महिला अत्याचाराच्या संबंधीत एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार असून त्याने उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. त्यात हा कलाकार महिलांचे शोषण करतो, असा दावा चित्रा वाघ यांनी केला होता. तसेच अशा कलाकाराला जाहिरातीमध्ये घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली?, असा सवाल चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी केला. यावरून राज्यात नवा वाद सुरू झाला आहे.
News Title : Actor Pyarali aka Raj Nayani reacts to Chitra Wagh allegations
महत्त्वाच्या बातम्या-
कोपर्डी बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट; …त्याला स्मशानभूमीत रात्रभर नग्न बसवले
मोठी दुर्घटना! हेलिकॉप्टर झालं क्रॅश; सुषमा अंधारे अन् पायलट…
काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात; या दोन गोष्टींमुळे गांधींचं पारडं जड राहणार