बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिल्पा शेट्टीला अभिनेता आर. माधवनचा पाठिंबा, म्हणाला…

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्राला अटक झाल्यानंतर देशभरातच एकच खळबळ उडाली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक गोष्टींचे धागेदोरे समोर आले. याशिवाय अनेकांनी समोर येत राज कुंद्रावर गंभीर आरोपही केले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम शिल्पा शेट्टीच्या आयुष्यावर होताना दिसत आहे. अशातच आता हळूहळू बाॅलिवूड कलाकारही याप्रकरणी शिल्पाला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत.

काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत कुटुंबाच्या गोपनियतेचा आदर राखण्याची विनंती केली होती. त्याचबरोबर सत्य जाणून घेतल्याशिवाय अर्धवट माहितीच्या आधारे टीका करू नका, असंही शिल्पानं म्हटलं होतं. तिच्या या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी पुढे येत तिला पाठिंबा दर्शवला आहे.

यातच अभिनेता आर. माधवननं कमेंट करत म्हटलं की, माझ्या ओळखीतल्यांपैकी तुम्ही सर्वात धैर्यवान व्यक्ती आहात. मला पूर्ण विश्वास आहे की, तुम्ही हे आव्हान धैर्यानं आणि सन्मानानं पेलू शकाल. आमच्या प्रार्थना नेहमीच तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत आहेत. आर. माधवन शिवाय अभिनेता वरुण धवन, मिजान झाफरी, दिया मिर्झा अशा अनेकांनी शिल्पाच्या पोस्टला लाइक देत पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक झाल्यापासून ते दोघेही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. याविषयी शिल्पानं काही न्युज चॅनेल विरोधात तक्रारही दाखल केली होती. मात्र न्यायालयानं याविषयी प्रसार माध्यमांना देखील पूर्ण स्वातंत्र्य असल्याचं म्हणत शिल्पाला सुनावलं होतं.

थोडक्यात बातम्या –

यो यो हनी सिंगच्या अडचणीत वाढ; पत्नीनं दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार

नीरज चोप्राची धडाकेबाज कामगिरी; भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये एन्ट्री

कोरोनानंतर आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ; लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संक्रमण

वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण…- प्रविण दरेकर

‘माझ्या अंगावरून गाडी घाला’; पुण्यात भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More