अभिनेता राहुल रॉयची आता भाजपसोबत ‘आशिकी’!

नवी दिल्ली | आशिकी सिनेमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता राहुल रॉय आता राजकारणात उतरलाय. केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीत त्याने भाजपमध्ये प्रवेश केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यामुळे देश प्रगतीपथावर आहे. मी जगभरात फिरतो तेव्हा मला तिथं भारताचं कौतुक होताना दिसतं. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, असं राहुल रॉयनं सांगितलं. 

भाजपमध्ये प्रवेश करुन आनंद झाला आणि पक्ष जी जबाबादारी देईल, ती सांभाळण्यास मी तयार आहे, असंही राहुलनं सांगितलं. 

पाहा व्हिडिओ-