बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘रितेश देशमुखच्या मुलांनी म्हटली गणपतीची आरती, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई | गणपती बाप्पांचं शुक्रवारी आगमन झालं आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. अनेकांनी आपल्या घरात अगदी थाटामाटात बाप्पांचं स्वागत केलं आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखच्या घरीही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. या निमित्तानं त्यानं सोशल मीडियावर एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेता रितेश देशमुख नेहमीच सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच्या व्हिडीओला पसंतीही तेवढीच भेटत असते. मात्र आता शेअर केलेल्या व्हिडीओचं सगळेचजण कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रितेश आणि जेनेलियाची दोन्ही मुले ‘सुखकर्ता… दुःखहर्ता’ ही बाप्पाची सुंदर आरती म्हणत आहेत.

रितेशचे दोन्ही मुलं रियान आणि राहिल दोघेही खूप गोड बाप्पांची आरती म्हणताना दिसत आहे. त्यामुळे या व्हिडीओवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आपल्या मुलांना चांगले संस्कार लावल्यामुळे रितेश आणि जेनेलियाचंही कौतुक होत आहे.

दरम्यान, रियान आणि राहिलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी रितेश आणि जिनेलीयाची स्तुती केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

थोडक्यात बातम्या –  

राज्याला पुढील 4-5 दिवस पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

अभिनेता साई धरम तेज अपघातात गंभीर जखमी; अपघाताचा व्हिडीओ आला समोर

बाळू मामाचा अवतार असल्याचं सांगत फसवणूक करणाऱ्या मनोहर भोसलेला अटक!

‘…तर कोरोना पुन्हा भयावह रूप धारण करू शकतो’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

अंजली दमानिया यांनी खुशाल हायकोर्टात जावं, आम्ही आणखी उजळ माथ्याने समोर येऊ – छगन भुजबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More