मुंबई | ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना रात्री उशिरा मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ऋषी कपूर यांना बरं वाटत नव्हतं. त्यांना त्रास होत होता. त्यामुळे आम्ही बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे असं ऋषी यांचे बंधू रणधीर यांनी सांगितलं आहे. त्यांच्यासोबत त्यांती पत्नी नितू आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
ऋषीची तब्येत जरी बिघडली असली तरी तो उपचार घेतल्यानंतर लवकरच बरा होईल असा विश्वास त्यांचे बंधू रणधीर यांनी व्यक्त केला आहे. तसंच आम्ही सगळा परिवार त्याची काळजी घेत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, त्यांना कर्करोगाचा आजार जडल्याने ते उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. वर्षभर ते तिकडेच होते. सप्टेंबर महिन्यात ते मायदेशात परतले होते. त्यानंतर काही दिवस त्यांची प्रकृती अतिशय उत्तम होती. परंतू बुधवारी तब्येत बिघडल्याने त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
परप्रांतीय मजूर, कामगार विद्यार्थी तसंच पर्यटकांना आता आपल्या घरी जाता येणार; केंद्राचा मोठा निर्णय
अभिनेता इरफान खानला कोणता आजार झाला होता?
महत्वाच्या बातम्या-
बारामती इंदापुरनंतर आता दौंडमध्ये कोरोनाचा शिरकाव; मिळाला पहिला रूग्ण
राज्यात कोरोनाचे आज 597 रूग्ण तर 205 जण ठणठणीत होऊन घरी; रिकव्हरिंग रेट सुधारतोय!
राज्यात आज कोरोनाच्या ५९७ नवीन रुग्णांची नोंद; पाहा तुमच्या भागात किती रुग्ण
Comments are closed.