Top News क्राईम महाराष्ट्र मुंबई

सुशांतसिंहसोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या; फेसबुकवर शेअर केला व्हिडीओ

Photo Courtesy- Facebook/Sandeep Nahar

मुंबई | दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्याबरोबर काम केलेल्या संदिप नाहर या अभिनेत्याने गोरेगावच्या आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. संदिपने एम.एस. धोनी, केसरी या चित्रपटांमध्ये तसेच अनेक टी.व्ही. शोजमध्येही काम केले आहे. दरम्यान ही घटना आत्महत्याच असल्याचे प्रथमदर्शनी दिसते, कारण मृत्युुपूर्वी त्याने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती.

फेसबूक व्हिडीओमध्ये त्याने बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला आहे. गेल्या 1-2 वर्षांपासून बायको मला मानसिक त्रास देत आहे, वर्षातील 365 दिवसांपैकी 200 दिवस मरणाची धमकी देते व इतर कुुटुंबियांनाही शिवीगाळ करते, असा उल्लेख व्हिडीओमध्ये करण्यात आला.

अभिनेता संदिप नाहर याने शेवटच्या त्या व्हिडिओद्वारे मी आयुष्यात खूप सुख-दु:खं पाहिली आहेत. माझी पत्नी कंचन शर्मा आणि तिची आई विनु शर्मा यांनी मला कधीही समजून घेतले नाही. अशा जगण्याचा काय फायदा जिथे तुम्हाला स्वाभिमान नाही आणि रोज उठ सुठ भांडणं होत असतील, असंही त्यानं म्हटलंय.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येने सारी चित्रपटसृष्टी हादरली असताना आता परत झालेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. सामाजिक आणि राजकिय वर्तुळात खळबळ माजवणाऱ्या त्या घटनेने अनेकांचे धाबे दणाणले होते.

पाहा व्हिडीओ –

थाेडक्यात बातम्या –

‘कोरोनापेक्षा जास्त घातक भाजप’; खासदार नुसरत जहाँचा भाजपवर निशाणा

‘पदावर बसणाऱ्यांकडूनच महिलांवर अत्याचार होत असतील तर…’; रक्षा खडसे आक्रमक

“स्वयंघोषित ‘जाणता राजा’ शरद पवार यांनी राजकीय स्वार्थासाठी नवा शोध लावला”

“…पण जयंतरावांच्या बॉसला हे अजूनही जमत नाही”

कोरोनाबाधितांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिली तर…- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या