मुंबई | मराठी मनोरंजन विश्वात असलेल्या मालिकांमधील मुख्य भूमिकांमध्ये फक्त ब्राह्मण मुलीच दिसतात. इतर मराठी मुली का दिसत नाहीत?, असा सवाल दिग्दर्शक सुजय डहाकेनी उपस्थित केलाय. त्यांच्या या प्रश्नावरुन आता वाद सुरु झालाय मराठी अभिनेता सौरभ गोखलेनी डहाकेला कानफडण्याची भाषा वापरली आहे.
जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण या कलाक्षेत्रात घुसविण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील याची नोंद घ्यावी, असं म्हणत सौरभ गोखलेने डहकेंच्या कानशीलात लगवण्याची भाषा वापरली आहे. सौरभने यासंबंधीत फेसबुक पोस्ट लिहली आहे.
स्वतःस अत्यंत प्रतिभावान आणि अभ्यासू समजणारे दिग्दर्शक मा. सुजय डहाके…आपण केलेली वक्तव्यांवर इतर कलाकारांनी आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी स्पष्टीकरण द्यावे इतकी तुमची लायकी नाही, असंही सौरभ आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.
दरम्यान, एका मुलाखतीत सुजय डहाकेने मालिकांतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींवर भाष्य केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन अभिनेता शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनीही डहाकेला सुनावलंय.
संबंधित बातम्या-
मी ब्राह्मण नाही पण…; तेजश्री प्रधाननं सुजय डहाकेला सुनावलं
“हा केतकर दररोज कांबळे-पवार यांच्या दिग्दर्शनाखाली काम करतो”
महत्वाच्या बातम्या-
…तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो; प्रकाश राज यांनी सांगितला उपाय
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या ‘या’ 7 खासदारांना केलं निलंबित!
काळ्यामातीशी जोडले गेल्याने पद्मश्री पुरस्कार मिळाला- बीजमाता राहीबाई पोपरे
Comments are closed.