महाराष्ट्र सातारा

साताऱ्यात प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड लावण्याचा अभिनेते सयाजी शिंदेंचा संकल्प!

सातारा | साताऱ्यातील प्रत्येक शहीद जवानाच्या नावाने एक झाड लावण्याचा संकल्प अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला आहे. दहा कोटींचा बंगला घेण्यापेक्षा झाड होऊन माळरानावर सावली द्या, असं सयाजी शिंदेंनी म्हटलंय.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी दुष्काळी माण तालुक्यात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून ‘जय जवान जय किसान’ ही नवीन संकल्पना आणली आहे.

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 255 जवान शहीद झाले असून प्रत्येक जवानाच्या नावाने एक झाड ही संकल्पना राबवण्याची संकल्पना सयाजी शिंदे यांनी मांडली आहे. माण तालुक्यात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून सयाजी शिंदे यांनी याआधीही दुष्काळी भागात हजारो झाडे लावली आहेत.

महत्वाच्या बातम्या-

इतका निर्दयीपणा आणि भयानक गुन्हा करणाऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे- रितेश देशमुख

एकनाथ खडसेंचा पक्षांतराचा निर्णय निश्चित?; कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

…त्या दोषींना फाशी द्या, शिक्षेचा विचार करुन आरोपी थरथर कापायला हवेत- अक्षय कुमार

राज्यपालांना वेळ भेटेना, मात्र ‘त्या’ शेतकरी पुत्रांचे गाऱ्हाणे ऐकले शरद पवारांनी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या