बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गांधींच्या अहिंसेनं लोक नपुंसक बनले- शरद पोंक्षे

मुंबई | विदेशातून आलेला बॅरिस्टर स्वत:सोबत एक लस घेऊन आला. त्याने टोचलेल्या लसीमुळे आपण अहिंसक होताहोता नपुंसक कधी झालो हे आपल्याला कळलं सुद्धा नाही, असं धक्कादायक वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलं आहे. कल्याणमध्ये अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलन समारोप सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पोंक्षे यांनी महात्मा गांधीवर टीका केली असून सावरकरांच्या विचारांचा पुरस्कार केला आहे. अहिंसा ही अनैसर्गिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महात्मा गांधींच्या अहिंसेनं गेल्या 80-90 वर्षात लोक नपुंसक झाले आहेत, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सावरकर ब्राह्मण होते म्हणून त्यांना विरोध होत आहे. दुसऱ्या कोणत्या जातीचे असते तर त्यांना विरोध झाला नसता. यामागे राजकारण आहे. गांधीजींच्या अहिंसा तत्वापेक्षा सावरकरांची तत्वं अधिक श्रेष्ठ आहेत. सावरकर यांना वाचल्यावर असं लक्षात येत की, ज्या माणसाने जात हा शब्द संपुष्टात आणण्यासाठी आयुष्य झिझवलं. त्याच माणसाला ब्राह्मण या तीन अक्षरात बंदिस्त करुन टाकण्यात आलंय, असंही पोंक्षे म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दंड चालवायला शिकवतात. पण मारायची वेळ आली की बौद्धिक घेतात. आपल्याला ते पटत नाही, म्हणून मी संघ सोडला आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक झालो, असं मत  शरद पोंक्षे यांनी यावेळी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More