बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मी संघ सोडला अन् बाळासाहेबांचा शिवसैनिक झालो- शरद पोंक्षे

मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दंड चालवायला शिकवतात. पण मारायची वेळ आली की बौद्धिक घेतात. आपल्याला ते पटत नाही, म्हणून मी संघ सोडला आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक झालो, असं मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं आहे. कल्याणमध्ये अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलन समारोप सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

गांधीजींच्या अहिंसा तत्वापेक्षा सावरकरांची तत्व अधिक श्रेष्ठ होतं. सावरकर यांना वाचल्यावर असं लक्षात येत की, ज्या माणसाने जात हा शब्द संपुष्टात आणण्यासाठी आयुष्य झिझवलं. त्याच माणसाला ब्राह्मण या तीन अक्षरात बंदिस्त करुन टाकलं, असंही पोंक्षे म्हणाले आहेत.

सावरकर आणि त्यांच्या पत्नीने कधीही जातीभेद मानला नाही. शिवरायांच्या हातात शस्त्र होतं म्हणून ते अफजलखानाचा वध करु शकले. त्यामुळे गांधीजींच्या तत्वापेक्षा सावरकारांची तत्व जास्त श्रेष्ठ होती, असंही शरद पोंक्षे म्हणाले आहेत.

दरम्यान, सावरकर ब्राह्मण होते म्हणून त्यांना विरोध होत आहे. दुसऱ्या कोणत्या जातीचे असते तर त्यांना विरोध झाला नसता. यामागे राजकारण आहे, असंही शरद पोंक्षे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More