सिनेसृष्टी हादरली, मुलाच्या मृत्यूच्या 2 महिन्यातच ‘या’ अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास
मुंबई | प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व पटकथा लेखक शिवकुमार सुब्रमण्यम (Shivkumar Subramaniam) यांचे दु:खद निधन झाले आहे. शिवकुमार सुब्रमण्यम यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टी चांगलीच हादरली आहे. शिवकुमार सुब्रमण्यम यांनी मुंबईत रविवारी रात्री उशिरा अखेरचा श्वास घेतला.
आज सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. चित्रपट निर्माते हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी शिवकुमार सुब्रमण्यम यांच्या निधनाची माहिती दिली आहे. शिवकुमार सुब्रमण्यम यांच्या निधनाची माहिती समोर येताच चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिवकुमार सुब्रमण्यम यांच्या मुलगा जहान याचं दोन महिन्यांपूर्वीच निधन झालं. वयाच्या फक्त 16व्या वर्षी जहानचा ब्रेन ट्यूमरमुळे मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूच्या केवळ दोन महिन्यांतच सुब्रमण्यम यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांच्या मृत्यूचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही.
दरम्यान, शिवकुमार सुब्रमण्यम यांनी ‘परिंदा’, ‘हजारो ख्वाईशे ऐसी’ या सारख्या चित्रपटांची पटकथा लिहिली होती तर अनेक हिट चित्रपटात काम देखील केलं होतं. शिवकुमार सुब्रमण्यम यांची ‘2 States’ या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. यात त्यांनी अभिनेत्री आलिया भटच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
थोडक्यात बातम्या-
“माथेफिरू गुणरत्नांना मांडीवर घेऊन आग लावणारे…”
LIC ची भन्नाट योजना! फक्त 73 रूपये गुंतवून मिळू शकतात 10 लाख रूपये
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेचा मोठा दावा
राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक आली समोर, पाहा फोटो
“भाजपचे काही नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागत आहेत”
Comments are closed.