देश

‘रामायण’ मालिकेत सुग्रीवची भूमिका साकारणारे श्याम सुंदर काळाच्या पडद्याआड

Loading...

नवी दिल्ली | ‘रामायण’ या मालिकेत सुग्रीवची भूमिका साकारणारे टेलिव्हिजन अभिनेते श्याम सुंदर कलानी यांचं निधन झालं. ते कॅन्सरग्रस्त होते. हरयाणामधील कालका येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर येत आहे.

‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. श्याम सुंदर यांच्या निधनाचे वृत्त कळताच फार दु:ख झालं. ते सज्जन व्यक्ती होते. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, असं ट्विट अरुण गोविल यांनी केलंय.

‘रामायण’मध्ये लक्ष्मणची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनीसुद्धा ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. श्याम सुंदर कलानी यांच्या निधनाच्या वृत्ताने कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, ‘रामायण’ या मालिकेतून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. मात्र त्यानंतर त्यांना फारसं काम मिळालं नाही.

 

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

गुटखा खाऊन पचापचा थुंकणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाला पोलिसांनी चोप चोप चोपला

मुंबईत वाढता कोरोनाबाधितांचा आकडा; महापालिका दक्षिण कोरियाकडून विकत घेणार 1 लाख किट्स

महत्वाच्या बातम्या-

शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा काय लोकांनी उपाशी राहावं का?- देवेंद्र फडणवीस

प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील ३६ स्टाफ चे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

तुझे हातपाय मोडले असते; पोलीस अधिकाऱ्याची जितेंद्र आव्हाडांना धमकी

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या