बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दानिश सिद्दिकी यांच्या मृत्यूचा आनंद साजरा करणाऱ्या प्रत्येकाचा नाश होईल”

नवी दिल्ली | पत्रकार दानिश सिद्दिकी यांचा अफगाणिस्तानमध्ये स्पीन बोल्डक भागात झालेल्या एका हल्ल्यात मृत्यू झाला. गेल्या काही काळापासून ह्याच भागात तालिबानी आणि अफगाण सैन्यात तुंबळ लढाई सुरु आहे. ते कव्हर करण्यासाठीच दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमध्ये होते. ते रॉयटर्स ह्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या न्यूज संस्थेसोबत काम करत होते. मात्र रिपोर्टिंग करताना त्यांचा मृत्यू झाला.

दानिश यांच्या मृत्यूवर अनेकांनी दु:ख व्यक्त करत सर्व स्तरातून त्यांना आदरांजली देण्यात आली. मात्र सोशल मीडियावर दानिश यांच्या मृत्यूनंतर आनंद साजर करणाऱ्या ट्रोलर्सला अभिनेता सिद्धार्थने चांगलंच सुनावलं आहे.

पत्रकार दानिश सिद्दिकी यांच्या मृत्यूवर आनंद साजरा करणाऱ्या प्रत्येकाचा नाश होवो अशी मी प्रार्थना करतो, असं म्हणत सिद्धार्थ यांनी दानिश यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त करणाऱ्यांना फैलावर घेतलं. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

मी दानिश सिद्दिकी यांच्यासाठी प्रार्थना करतो. तुमच्या जीवनाला माझा सलाम आहे. आम्ही तुमची नेहमीच अभिमानाने आठवण काढू. तुमच्या कुटुंबाला प्रेम आणि ताकद मिळो हीच सदिच्छा. युद्धभूमीवर मृत्यू आलेला पत्रकार हा लढणाऱ्या सैनिकासारखाच असतो, असंही सिद्धार्थने म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“अभिनय करून पोटापाण्याचं पहा, फार डोकं चालवू नका”

“योगींनी लोकसंख्या नियंत्रण कायदा लावलाच तर UP भाजपचे 160 आमदार बाद होतील”

अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांच्या लसीकरणबाबत सरकारने उचललं मोठं पाऊल!

पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा ‘या’ तारखेपर्यंत बंदच राहणार!

पवार-मोदी भेटीनंतर संजय राऊतांचा भाजपला इशारा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More