बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेता सिद्धार्श शुक्ला आपल्या मागे सोडून गेलाय ‘इतक्या’ कोटींची संपत्ती!

मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं अकाली निधन झाल्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थ शुक्ला हा बिग बॉस 13 रिअॅलिटी शोचा विजेता ठरला होता. त्यामुळे शुक्लाने सोशल मीडियावर कमी वेळेत प्रसिद्धीसोबत संपत्तीसुद्धा मिळवली होती.

सिद्धार्श शुक्लाला पहिल्यापासून गाड्यांची खूप आवड होती. त्याच्याकडे बीएम डब्लूपासून अनेक महागड्या गाड्या होत्या. शुक्लाने राहण्यासाठी वेगवेगळ्या शहरात मोठ्या किंमतीची घरं विकत घेतली होती. त्याचबरोबर शुक्लाने अलिकडेच शानदार लक्झरी घर देखील खरेदी केलं होतं.

सिद्धार्थ प्रसिद्धीच्या झोकात आल्यानंतर त्याच्या संपत्तीमध्येही प्रचंड वाढ होताना दिसून आली होती. 2020 पर्यंत सिद्धार्थची नेटवर्थ तब्बल 1.5 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रूपयात ती 11 कोटी इतकी होती.

दरम्यान, सिद्धार्थला अचानक ह्दय विकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला कपूर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार चालू असताना त्याचं निधन झालं आहे. सिद्धार्थ शुक्ला नेहमी लोकांच्या चर्चेत राहणारा अभिनेता आहे. त्यामुळे शुक्लाच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मोदींच्या जीवावर विजयी व्हायचं अन्…’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; पाहा व्हि़डीओ

‘मंदिरं खुली करा नाहीतर…’; मनसेचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम!

व्हाट्सअॅपचा मोठा दणका! भारतातील ‘तशा’ वापरकर्त्यांची खाती केली बंद

…अन् मुलाने थेट कानशिलात लगावली; लखनऊ मुलीच्या व्हिडीओनंतर ‘या’ व्हिडीओचा धुमाकूळ

“मी एक भारतीय मुस्लीम, मला शासन असलेल्या धर्माची गरज नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More