Top News मनोरंजन शेती

शेतकरी आंदोलनावर अखेर सोनू सूदही बोलला पण जरा जपूनच!

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या शेतीविषयक कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. दरम्यान मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन सुरु ठेवण्याचा इशाराही शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अनेक सेलिब्रेटींनी पाठिंबा दिला आहे. तर आता बॉलिवूड स्टार सोनू सूद याने देखील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिलं आहे.

यासंदर्भात सोनू सूदने ट्विट केलंय. सोनूनं ट्विटमध्ये केवळ 3 शब्द लिहीत शेतकऱ्यांना आपलं समर्थ असल्याचं दर्शवलंय. ‘किसान है हिंदुस्तान’ म्हणजेच शेतकरी हिंदुस्तान आहे, अशा आशयाचं ट्विट त्याने केलंय.

सध्या सोशल मीडियावर सोनूचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे. बऱ्याच लोकांनी यावर प्रतिक्रिया देत सोनूचं कौतुक देखील केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना लसीची किंमत किती? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

‘मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल’, चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

“महाविकास आघाडीला मनात जागा देऊन जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली”

“…म्हणून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव झाला”

“फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या