मनोरंजन

स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूदने उचललं मोठं पाऊल

मुंबई |  स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूदने मोठं पाऊल उचललं आहे. ‘प्रवासी रोजगार’ नावाने अ‌ॅप लॉन्च करून स्थलांतरित मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी तो पुढे सरसावला आहे. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदने याबद्दलचा खुलासा केला आहे.

“हे काम सुरू करण्यासाठी किंवा हे पाऊल उचलण्यासाठी गेले अनेक दिवस मी प्लॅनिंग करत होतो, त्यावर विचार करत होतो. या कामानिमित्त समाजातील अनेक क्षेत्रांतील लोकांशी माझं बोलणं सुरू होतं. मग त्यामध्ये तरूण, स्वयंसेवी संस्था, ग्रास रूटला काम करणाऱ्या संस्था तसंच मजूर वर्ग यांच्याशी माझा संवाद झाला तसंच त्यांच्याशी मी सल्लामसलत केली”, असं सोनू सूदने सांगितलं.

या अ‌ॅपच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतल्या अनेक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. यासंबंधीची सगळी माहिती या अ‌ॅपमध्ये असेल. जवळपास 500 कंपन्यांमधील नोकरीच्या संधींची माहिती या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळेल.

समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करण्यास हे अ‌ॅप उपयुक्त ठरणार आहे. कापड व्यवसाय, बांधकाम उद्योग, आरोग्य, ऑटोमोबाईल्स, ई कॉमर्स या आणि अशा विविध क्षेत्रांतील कंपन्यांमधली नोकरीची माहिती या अ‌ॅपमधून मिळेल.

दुसरीकडे सोनू सूदने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून स्थलांतरित मजुरांना मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. या मदतीचा ओघ आणखीही सुरू आहे. मजुरांना आपापल्या गावी सोडण्याचा ध्यासच सोनूने घेतला होता. मजुरांनी ट्विट करून त्याला आपली अडचण सांगायची आणि सोनूने ती सोडवायची, हे चित्र लॉकडाऊन काळात पाहायला मिळत होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

‘वर्ल्डकप खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आयपीएल व्हायला हवी’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं वक्तव्य

समाजकार्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे, ‘स्व’-रुपवर्धिनीचे ज्ञानेश पुरंदरे यांचं निधन

सुशांतसाठी अंकितानं लिहिली आणखी एक पोस्ट, पोस्टमध्ये म्हणते…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या