मुंबई। आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. तर, दुसरीकडे काही लोक या आरेतील कारशेडच्या निर्णयाला पाठिंबा देत आहे. यावरून बरेच वादही निर्माण झाले आहेत. आता या प्रकरणी अभिनेते सुमीत राघवन (Sumeet Raghvan) यांनी देखील एक ट्वीट केले आहे.
सुमीत राघवनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ससरकारला विनंती केली आहे. सुमीत म्हणाला की, आता हे वाद पुरे झाले आम्ही मुंबईकर (#MumbaiMetro3) ची आतुरतेने वाट पाहत आहोत. मी स्वतः नेहरू नगर, कुर्ला (पू)चा आहे. माझ्याबरोबर इतर लोकांची सुद्धा हीच मागणी आहे. परंतु प्रश्न राहिला कुठला तर कार शेड तिथेच बनवण्याचा.
पुढे, सुमीतने महारष्ट्राचे मंत्री (Chief Minister) आणि उपमुख्यमंत्री(Deputy Chief Minister) एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांना विनंती केली की, यावर एकदाचा निर्णय घ्या. हे गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे, जर दर दोन वर्षांनी असाच सुरु राहिलं तर त्याला काही अर्थ नाही, असं सुमीतने म्हटलंय.
सुमीतने मुंबईकरांना देखील प्रश्न करत ट्विट केलं की, मुंबईकर जर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर आपण आज आता आवाज करणं गरजेचं आहे. सरकार कडून एक प्रोजेक्ट धड होऊ शकत नाही? पैसा, जीव, वेळ काही किंमत आहे की नाही?, असं देखील सुमीत म्हणाला आहे.
थोडक्यात बातम्या-
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू!
अल्ट न्यूजचे संचालक मोहम्मद जुबेर यांना न्यायालयाचा दिलासा!
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर प्राणघातक हल्ला!
‘…म्हणून आमदार शिवसेनेतून भाजपात गेले’, छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
‘घरात घुसून मारलं होतं ना?’, कंगना रनौतने पुन्हा करण जोहरला डिवचलं
Comments are closed.