तुमची ‘नाटकं’ बंद करा अन्यथा ‘नाटक’ बंद; अभिनेता सुमित राघवन भडकला

मुंबई |  नाटक पाहताना प्रेक्षकांचा बेजबाबदारपणा, सतत वाजणारा मोबाईल, लहान मुलांचा रडण्याचा आवाज, दरवाजातून सारखी ये-जा करताना होणारी आदळआपट या सगळ्या प्रकार आणि प्रसंगांनी मराठी नाट्यसृष्टी त्रासून गेली आहे. नाशिकच्या प्रयोगादरम्यान अभिेनेता सुमित राघवन यांना अश्याच प्रसंगांना सामोरं जावं लागलं. यावरच सुमितने आवाज उठवलाय.

नाशिकमध्ये सुमित राघवन यांच्या ‘एक शून्य तीन’ नावाच्या नाटकाचा प्रयोग चालू होता. यादरम्यान प्रेक्षकांच्या बेजबाबदारपणाचा अनुभव सुमित राघवन यांना आला. यानंतर त्यांनी चिडून फेसबुक पोस्ट लिहिलीये. त्या फेसबुक पोस्टमधून त्यांनी आपला मनस्ताप व्यक्त केला आहे.

मराठी नाट्यसृष्टीतल्या कलाकरांनी सुमित यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली आहे. त्यांनाही बऱ्याचदा अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते आहे. अभिनेते संजय मोने, चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी यांनी देखील प्रेक्षकांच्या वागण्यावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नाटक पाहताना प्रेक्षकांनी आपल्यामुळे शेजारच्या व्यक्तीला आणि समोरच्या कलाकारांना त्रास होणार नाही ही दक्षता घ्यावी, असं आवाहन मराठी नाट्यसृष्टीतले अभिनेते करतायेत.

महत्वाच्या बातम्या

-अखेर ठरलं! बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमीपूजन जुलै महिन्यात

-राज्यातील विद्यमान 40 आमदारांचं भाजप तिकीट कापणार???

-काँग्रेसचा ‘हा’ माजी आमदार प्रकाश आंबेडकरांच्या गळाला??

-रणजितसिंह नाईकांनी बोलल्याप्रमाणे करून दाखवलं…! बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद

-अमित शहांनी भाजपच्या ‘या’ खासदाराला फोन करून खडसावले