Top News देश

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नवं नाट्य, तपासासाठी आलेले पाटण्याचे SP….

मुंबई |  सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नवं नाट्य पाहायला मिळतंय. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारच्या पाटण्याचे पोलिस अधिक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकने क्वारंटाईन केलं आहे. मुंबईतल्या गोरेगावच्या एसआरपीएफ कॅम्पमध्ये त्यांना क्वारंटाईन करण्यात आलंय.

तिवारी यांच्या हातावर मुंबई महानगरपालिकेने क्वारन्टाईनचा शिक्का मारला आहे. हातावरच्या शिक्क्यानुसार त्यांना 15 ऑगस्टपर्यंत क्वारन्टाईन रहावं लागणार आहे. बाहेर पडण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या चौकशी प्रकरणाला आता महाराष्ट्र पोलिस विरूद्ध बिहार पोलिस असा रंग चढू लागलेला आहे. कारण बिहार राज्य सरकारने महाराष्ट्र पोलिसांवर आरोप करत सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, अशी मागणी केली आहे.

मी मुंबई महानगरपालिकेच्या सूचनेचं पालन करतोय. महानगरपालिकेने क्वारंटाईन करण्याची प्रोसेस केल्याने मी सध्या गोरेगावच्या एसआरपीएफ कॅम्पमध्ये आहे, अशी प्रतिक्रिया पाटण्याचे पोलिस अधिक्षक विनय तिवारी यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

खासदार नवनीत राणा यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, कुटुंबातील तब्बल 7 जणांना कोरोनाची लागण

“सत्ता गेल्याने ह्यांची डोकी कामातून गेली आहेत, फडणवीस तुम्ही दिल्लीली जा अन्…”

महाराष्ट्राची रूग्णसंख्या साडेचार लाखांच्या आसपास तर या शहरात सर्वाधिक अ‌ॅक्टिव्ह रूग्ण…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या