बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेता सुयश टिळकने सर्वांना दिला सुखद धक्का; ‘या’ अभिनेत्रीसोबत केला साखरपुडा

मुंबई | ‘का रे दुरावा’, ‘शुभमंगल ऑनलाईन’ यासारख्या मालिकांमधून लोकप्रिय झालेला अभिनेता सुयश टिळकने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सुयशने नुकताच गर्लफ्रेण्डसोबत साखरपुडा केला आहे. अभिनेत्री आयुषी भावेसोबत साखरपुडा झाल्याची घोषणा सुयशने केली असून आपल्या साखरपुड्याचे फोटो दोघांनीही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

आयुषी इन्स्टाग्रामच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशात सुयशसोबतच आयुषीनेही साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. तो हॅपी बर्थडे म्हणाला, मी होकार दिला, असं कॅप्शन तिने दिलं आहे.

सुयशने आपल्या फोटोंमध्ये आमचा साखरपुडा झाला असल्याची घोषणा करताना मला अत्यानंद होत असून प्रियजनांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांसह आम्ही आमचा एकत्र प्रवास सुरु करतोय आणि कुटुंबीय आणि मित्रांचे हा दिवस खास करण्यासाठी आभार असं कॅपशन दिलं आहे.

दरम्यान, आयुषी भावे ही 2018 मध्ये महाराष्ट्राची श्रावणक्वीन किताबाची मानकरी ठरली होती. त्यानंतर तिने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी सहभागी झाली होती. आयुषी भावे लवकरच मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण करणार आहे.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by A a y u s h i (@aayushibhave)

थोडक्यात बातम्या-

“तुमची गाडी पेट्रोल, डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं”

‘भास्कर जाधव यांनीच आईवरुन शिवी दिली’; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

“काल त्यांनी प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील”

जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यता- असीम सरोदे

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 9 हजारांनी वाढ, कोरोनाबळी पुन्हा नऊशेपार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More