Actor Tiku Talsania Health Update | बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते टिकू तलसानिया यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. टिकू तलसानिया यांना हृदय विकाराचा झटका आल्याचं बोललं जात होतं. मात्र,त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. टिकू तलसानिया यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची कालपासून चर्चा होती. (Actor Tiku Talsania Health Update)
मात्र, आता त्यांच्या पत्नीने त्यांच्या तब्येतीबद्दलची माहिती दिली आहे. टिकू तलसानिया यांना शनिवारी ब्रेन स्ट्रोक आला असून त्यांच्यावर अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेत्याची प्रकृती सध्या अत्यंत नाजुक असल्याची माहिती आहे.
टिकू तलसानिया हेल्थ अपडेट
सुरुवातीला अभिनेते टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आला, असं म्हटलं जात होतं. मात्र, नंतर त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती उघड झाली. या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. टिकू हे इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी चाहते प्रार्थना करत आहेत. ते लवकरच बरे होतील अशी सर्वांना अपेक्षा आहे.
टिकू तलसानिया यांच्या पत्नी दिप्ती तलसानिया यांनी सांगितलं की, एका चित्रपपटाच्या स्क्रिनिंगसाठी टिकू तलसानिया बाहेर गेले होते. त्याच ठिकाणी रात्री 8 वाजता त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याठिकाणी त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. (Actor Tiku Talsania Health Update)
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेते टिकू तलसानिया यांनी छोट्या पडद्यासोबत चित्रपटांतही काम केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. 1984 मध्ये “ये जो है जिंदगी” या टीव्ही शोपासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. कॉमिक्स रोलसाठी ते प्रचलित आहेत.
टिकू तलसानिया यांचे चित्रपट-
सर्कस
हंगामा
स्पेशल 26
देवदास
वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा
“अंदाज अपना अपना” या चित्रपटात त्यांनी इंस्पेक्टर पांडेची भूमिका केली होती. या भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. तर, हंगामा चित्रपटात त्यांनी पोपट सेठच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. (Actor Tiku Talsania Health Update)
News Title : Actor Tiku Talsania Health Update
महत्त्वाच्या बातम्या-
दिवसाची सुरुवात आनंदवार्ताने, पेट्रोल-डिझेलचे दर ‘इतक्या’ रुपयांनी घसरले?
आजचे राशीभविष्य! कुंभ, मकर व तुळसह ब्रह्म योगात ‘या’ राशींचं भाग्य उजळणार
“धनंजय मुंडे तुमची टोळी थांबवा”, अन्यथा….; जरांगे पाटलांचा इशारा
संतोष देशमुखांची हत्या ‘इतक्या’ कोटींसाठी केली, सुरेश धसांचा हल्लाबोल
“…तरच सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींवरील मोक्का टिकेल”, वकील नेमकं काय म्हणाले?