प्रसिद्ध अभिनेत्याला आला हार्टअटॅक, बातमीने सिनेसृष्टीत उडाली खळबळ

Actor Tiku Talsania Suffers Heart Attack

Actor Tiku Talsania | बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते टिकू तलसानिया यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. टिकू तलसानिया यांना हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या नाजुक असल्याचं म्हटलं जातंय. यामुळे चाहत्यांची देखील चिंता वाढली आहे. (Actor Tiku Talsania)

70 वर्षीय अभिनेते टिकू तलसानिया यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा आहे. या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. टिकू हे इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी चाहते प्रार्थना करत आहेत. ते लवकरच बरे होतील अशी सर्वांना अपेक्षा आहे.

टिकू तलसानिया यांना हृदय विकाराचा झटका

टिकू तलसानिया यांची सध्या तब्येत कशी आहे, त्यांच्यावर कुठे उपचार सुरू आहेत याबाबत त्यांच्या कुटुंबियांकडून कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्याच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. (Actor Tiku Talsania)

अभिनेते टिकू तलसानिया यांनी छोट्या पडद्यासोबत चित्रपटांतही काम केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. 1984 मध्ये “ये जो है जिंदगी” या टीव्ही शोपासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. कॉमिक्स रोलसाठी ते प्रचलित आहेत.

टिकू तलसानिया यांचे चित्रपट-

सर्कस
हंगामा
स्पेशल 26
देवदास
वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा

“अंदाज अपना अपना” या चित्रपटात त्यांनी इंस्पेक्टर पांडेची भूमिका केली होती. या भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. तर, हंगामा चित्रपटात त्यांनी पोपट सेठच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अशात त्यांच्या प्रकृतीमुळे ते चर्चेत आले आहेत. टिकू तलसानिया लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना चाहत्यांकडून केली जातेय. (Actor Tiku Talsania)

News Title :   Actor Tiku Talsania Suffers Heart Attack

महत्त्वाच्या बातम्या-

वाल्मिक कराडवर MCOCA का लागला नाही?, मोठं कारण समोर

वाल्मिक कराड इतक्या दिवस जेलमध्ये राहणार, समोर आली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! सरपंच हत्ये प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का, मात्र वाल्मिक कराडवर…

तारक मेहताच्या सोढीची प्रकृती चिंताजनक, अन्नपाणीही सोडलं

जबरदस्ती घर नावावर केलं, रिव्हॉलव्हरचा धाक दाखवून…; वाल्मिक कराडच्या मुलावर गंभीर आरोप

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .