बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तो एक तेजस्वी तारा होता’; अभिनेता पुनीत राजकुमारच्या निधनानंतर सिनेसृष्टी हळहळली

मुंबई | कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक, क्रिकेटपटू, राजकारणातील दिग्गजांनी भावनिक शब्दात पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आमच्यातील सर्वात दयाळू छान, आणि उदात्त असलेला तो गेला. मला आता फार उद्धवस्त झाल्यासारखे वाटत आहे.  तुम्ही आम्हाला फार गोंधळात टाकलं आहे. मला अजूनही आशा आहे की हे खरे नाही, असं ट्विट करत अभिनेता आर. माधवनने पुनीतला श्रद्धांजली वाहिली आहे. तर ‘धक्कादायक तुझी फार आठवण येईल’, अशा शब्दात अभिनेता सोनु सुदने शोक व्यक्त केला आहे.

आमचे लाडके पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल अत्यंत दु:ख झालं आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांप्रती मी शोक व्यक्त करतो. त्यांच्या चाहत्यांनी शांतता राखावी, अशी मी विनंती करतो, असं प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसादनी म्हटलं आहे. तर पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करते, तो एक तेजस्वी तारा होता. त्यांचे मित्र, कुटुंब, आणि चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करते, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ, तमान्ना भाटिया, बोनी कपूर, हंसिका या सिनेकलाकारांनी देखील अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पुनीत यांना शुक्रवारी दुपारी ह्यदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र रूग्णालयातच उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

“माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, मी साधी सिगारेट देखील ओढत नाही”

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार यांचं निधन

“राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना, त्यामुळे….”

‘राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही’; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर प्रहार

अंड वापरा आणि केसांचं गळणं थांबवा, कसं ते जाणून घ्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More