बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्र सरकारविरोधात बाॅलिवूडचे कलाकार एकवटले, नव्या सिनेमॅटोग्राफ विधेयकाला जोरदार विरोध

मुंबई | गेल्या काही वर्षापासून केंद्र सरकारने आणलेली सुधारणा विधेयके चर्चेचा विषय राहिली आहेत. सीएए एनआरसी, नवीन कृषी कायदे यांच्यासारख्या कायद्यांमुळे देशात मोठी आंदोलने केली गेली आहेत. त्यातच आता बाॅलिवूडचे कलाकार देखील आता रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या सेन्सॉर बोर्डाच्या नियमांत केंद्र सरकार काही नवीन बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता बाॅलिवूड विरूद्ध केंद्र सरकार असा वाद रंगण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने सिनेसृष्टीसाठी लवकरच नवा कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सिनेमॅटोग्राफ बिल 2021’  असं या नव्या कायद्याचं नाव आहे. मात्र सिनेसृष्टीतील अनेकांनी याला कडाडून विरोध केला आहे. तर अनुराग कश्यप, फरहान अख्तर, सुधीर मिश्रा यांच्यासह 1400 सेलिब्रेटींनी याचिका देखील दाखल केल्या आहेत. या कायद्यानुसार केंद्र सरकारच्या हातात संपुर्ण पाॅवर जात असल्याचं सांगितलं जात आहे.

या नव्या कायद्यानुसार जरी एखादा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने पारित केला तरी त्यात हस्तक्षेपाचा अधिकार केंद्र सरकारला मिळणार आहे. केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाल्या नंतरही चित्रपटाची पडताळणी होऊ शकते. जर चित्रपटात अक्षेपार्ह आढळलं तर चित्रपट रिलीज झाल्यानंतर देखील त्याला कात्री लागू शकते. त्यामुळे या कायद्याला कडाडून विरोध होत आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून बाॅलिवूडच्या कलाकारांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उचलून धरला आहे. चित्रपटाला सेन्सर असावं की नको, यावर देखील मोठ्या चर्चा सुरू आहेत. त्यातच आता या कायद्यानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धक्का बसत असल्यानं हा वाद आणखी वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या; चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

बंडातात्या कराडकर यांना समजावण्यात अखेर पोलिसांना यश; पायी वारीचा निर्णय मागे

ब्रेकिंग! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला, पुन्हा कडक लॉकडाऊन

‘…तर मला आधी मुख्यमंत्रिपदावर बसवा’; छत्रपती संभाजीराजे भोसलेंचं मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More