बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूडकरांनाही कोरोनाची लागण होताना दिसत आहे. आता अभिनेत्री आलिया भट्टला देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याची अधिकृत माहिती आलिया भट्टकडून देण्यात आली नाही. मात्र फिल्मफेअरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करुन आलिया भट्टला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणबीर कपूरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता रणबीर कपूर बरा झाला असून त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. रणबीर बरा झाल्यानंतर आलिया रणबीरसोबत जुहू येथे दिसली होती.

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. त्यामध्येच आलिया भट्टला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आल्याने चित्रपटाचं शुटींग काही काळासाठी पुढं ढकललं जाऊ शकतं.

काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरी देखील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाहीये. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 40 हजार पार गेला आहे. गुरुवारी 43183 नवीन रुग्णांची नोंद झाली. यानंतर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 28,56,163 वर पोहोचला आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुंबईतील लॉकडाऊनसंदर्भात किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, ‘या’ बड्या खेळाडूनं वर्तवलं अशुभ भाकीत!

14 वर्षांचं प्रेम मात्र फक्त एक नकार आणि झाला रक्तरंजीत शेवट!

राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे धक्क्यावर धक्के, ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

उत्तर प्रदेश पोलिसांची अब्रू धुळीला, पोलिसासमोर चोरांनी गाडी नेली चोरुन!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More