मनोरंजन

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेचा खळबळजनक खुलासा, म्हणाली…

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने खळबळजनक खुलासा केला आहे.  सुशांतची गर्लफ्रेंड रिया ही त्याला खूप त्रास द्यायची, याबाबत सुशांतने स्वत: तिला सांगितलं, असं अंकिताने बिहार पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.

बिहारच्या पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात सुशांतचे वडील के. के. सिंह यांच्या तक्रारीनंतर रिया चर्कवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जबाब नोंदवण्यासाठी आज बिहार पोलीस अंकिता लोखंडेच्या घरी पोहोचले. गोरेगाव येथील अंकिताच्या राहत्या घरी बिहार पोलिसांनी भेट देत तिचा जबाब नोंदवला.

मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सुशांतने आपल्याला फोन केला होता. यावेळी त्याने माझं अभिनंदन केलं. त्यानंतर तो रिया बद्दल बोलत होता, असं अंकिताने सांगितलं आहे.

रिया मला खूप त्रास देते. तिच्या सोबतच्या रिलेशनमध्ये मला रहायचं नाही. मला तिच्या पासून दूर व्हायचं आहे. मला काही सुचत नाही, असं सुशांतच म्हणणं होतं, अशी माहिती अंकिताने पोलिसांना दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

केंद्र सरकारकडून अनलॉक 3 च्या गाईडलाईन्स जारी; पाहा काय सुरु? काय बंद?

रेल्वेच्या भायखळा रुग्णालयात आरोग्य सहाय्यक म्हणून ‘रोबोट’ दाख

राफेल भारतात दाखल होताच चंद्रकांत पाटलांना झाली मनोहर पर्रिकरांची आठवण!

या पठ्ठ्याचा नाद खुळा! सर्व विषयांमध्ये मिळवले 35 गुण…

डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ कॉलेजला १२ कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या