बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझ्यासारख्या कलाकारांना…”, अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने सांगितले मराठी इंडस्ट्रीतले धक्कादायक अनुभव

मुंबई | सिनेमा, नाटक आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेनं मराठी इंडस्ट्री बाबत काही खुलासे केले आहेत. भार्गवीने कलाकारांच्या सोशल मीडिया वापरावर मत व्यक्त केलं आहे. भार्गवी चिरमुले मुलाखतींमध्ये अनेक विषयांवर आपले मत मांडत असते. त्यातच आता मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल भार्गवीने भाष्य केलं आहे.

भार्गवीने बोलताना मी गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्री काम करत आहे. एखादी चांगली भूमिका किंवा प्रोजेक्ट आल्यावर लोक फक्त आपल्याचं ग्रुपचा विचार करतात. इंडस्ट्रीमध्ये गटबाजीमध्ये बदल व्हावा, असं मत भार्गवी चिरमुलेनं व्यक्त केलं आहे. यामुळे माझ्यासारखे जे कलाकार आहेत त्यांना गटबाजीचा मोठा फटका बसतो, असं भार्गवीने म्हटलं आहे.

काही प्रोजेक्टसमध्ये मी अशा काही भूमिका आणि पात्र पाहिली आहेत की, ज्यांना पाहून मला वाटले की, त्यांच्या जागी मला संधी मिळाली असती तर चांगल्या प्रकारे काम केलं असतं. गटबाजी करणाऱ्या लोकांनी चौकटीच्या बाहेर येऊन विचार केला पाहिजे. इंडस्ट्रीतील परिस्थिती बदलायला हवी, असं भार्गवी चिरमुलेनं म्हटलं आहे.

दरम्यान, नवोदित कलाकारांनी अभिनयाला प्राधान्य द्यायला हवे, असं मत भार्गवी चिरमुलेनं व्यक्त केलं आहे. भार्गवी सध्या आई माझं मायेचं कवच या मालिकेमध्ये काम करत आहे. इंडस्ट्रीतील गटबाजीवर भार्गवी चिरमुले व्यक्त झाली आहे. ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत भार्गवीने यावर भाष्य केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“महाविकास आघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए”

‘कच्चा बादाम’ गाण्यावर चिमुकलीचा क्यूट डान्स व्हायरल; तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

काँग्रेसमध्ये दुफळी! कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला घरचा आहेर, म्हणाले…

“दरेकरांनी आडनाव बदलून दरोडेखोर करावं”

Russia Ukraine War: एलोन मस्कचं पुतीन यांना खुलं आव्हान, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More