Top News

जरा तरी लाज बाळगा, भाजप नेत्याला अभिनेत्रींनी फटकारले

मुंबई | भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला याचा फायदा भाजपला होईल आणि कर्नाटक मध्ये भाजप 22 जागा जिंकेल, असा दावा करणाऱ्या भाजप नेते बी.एस.येडियुरप्पा यांना अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि रेणुका शहाणे यांनी फटकारलं आहे.

जरा तरी लाज बाळगा, हा व्हीडिओ गेम नाही, लोकांचे प्राण गेले आहेत, असं अभिनेत्री रिचा चढ्ढा हिनं म्हटलं आहे.

भारताचे जवान सीमेवर गस्त घालत असताना आणि अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असताना काही लोकांना फक्त मतांमध्ये रस असतो, अशी टीका रेणुका शहाणे यांनी केली आहे.

दरम्यान, आपल्या वक्तव्यावर टीका होत असल्याचं लक्षात येताच, आपल्या वक्त्यव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

माढ्यातून पवारांविरोधात भाजपचा ‘हा’ तगडा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात?

अभिनंदन यांच्या सुटकेवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आनंद!

भारतीय लष्कराकडून कारवाईचे पुरावे सादर, पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा फाडला!

… तोपर्यंत आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करत राहू- भारतीय लष्कर

“सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या